रन फॉर युनिटीत धावले 300 भुसावळकर
भुसावळ शहरात खान्देश स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजन
300 Bhusawalkars ran in Run for Unity भुसावळ : भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 वी जयंतीनिमित्त खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे रविवारी रन फॉर युनिटी स्पर्धा घेण्यात आली. 5 व 3 किलोमीटर अंतराच्या स्पर्धत तब्बल 300 भुसावळकरांनी सहभाग नोंदवला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रीपाईंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यांची स्पर्धेला उपस्थिती
सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने रविवारी शहरातील प्रमुख मार्गावर रन फॉर युनिटी ही मॅरेथॉन घेण्यात आली. यावेळी अध्ययन पॅरामेडीकल कॉलेजच्या डॉ.वंदना वाकचौरे, प्राचार्य मनिषा बाविस्कर, राजेश टंडन, होमगार्ड विभागाचे सुरेश इंगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंग रावळ, स्पोर्टस् क्लबचे योगेश तिवारी, नवीन कुकरेजा, राजेश प्रजापती, तुषार सुरवाडे आदी उपस्थित होते.


तीन व पाच किलोमीटर अंतरासाठी स्पर्धा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. तीन व पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत जामनेर रोडवरुन स्पर्धेक धावले. तीन किलोमिटर व पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत प्रत्येकी 16 अशा 38 स्पर्धकांना चषक देण्यात आले. स्पर्धेतील सहभागी रनरला प्रमाणपत्र, गुडी बॅग देण्यात आली. तर नाश्त्याची सोय करण्यात आली होती. या स्पर्धेतील धावपटूंचा उत्साह उल्लेखनीय होता.