बनावट जात प्रमाणपत्राचा फटका : कंडारीच्या सरपंच सुवर्णा कोळी अपात्र

जात प्रमाणपत्र बनावट असल्याने जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय


Fake caste certificate hit: Kandari sarpanch Suvarna Koli disqualified भुसावळ : तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नितीन कोळी यांचे टोकरे कोळी जात प्रमाणपत्र बनावट असल्याने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती, धुळे यांनी 7 सप्टेंबर रोजी रद्द केले होते. हे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांना सरपंच पदावरुन अपात्र करावे, अशी तक्रार दीपक तायडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सरपंच अपात्रतेचे आदेश दिले आहेत.

ग्रामपंचायत वर्तुळात प्रचंड खळबळ
कंडारी येथील सरपंच सुवर्णा शांताराम सोनवणे उर्फ सुवर्णा नितीन कोळी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दीपक तायडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने हे प्रमाणपत्र पोलिस पक्षता पथकाच्या चौकशीत बनावट असल्याचे सिध्द झाले होते. यामुळे हे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश 7 सप्टेंबरला दिले होते. यांनतर तक्रारदार दीपक तायडे यांनी सुवर्णा कोळी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याने त्यांना सरपंच पदावरुन अपात्र करावे अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी 31 ऑक्टोंबरला अर्जदाराचा अर्ज मंजुर करीत सरपंच सुवर्णा कोळी यांना अपात्र ठरवले आहे. या प्रकरणी आता पुढे त्या काय भुमिका घेतात? याकडे कंडारीच्या राजकिय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !