ही तर सरड्याची औलाद….मंत्री सत्तारला धडा शिकवणार : बेताल वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक


मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अत्यंत गलिच्छ शब्दांत टीका करणार्‍या राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्तार यांनी सुळे यांना दिलेल्या शिवीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील सत्तार यांच्यावर घरावर दगडफेक केली तर राज्यभरात वक्तव्याच्या निषेधार्थ अब्दुल सत्तारांच्या प्रतिमाही जाळण्यात येत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या व्हिडीओत शेख यांनी मंत्री सत्तारांचा एकेरी शब्दांत उल्लेख करून आपला संताप व्यक्त केला आहे. शेख यांनी सत्तारांवर निशाणा साधताना म्हटले, दहा पक्ष आणि दहा बाप बदलणारी ही सरड्याची औलाद अत्यंत खालच्या भाषेत सुप्रियाताईंबद्दल बोलत आहे. अशा शब्दांत शेख यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही
शेख यांनी सत्तारांच्या विधानाचा निषेध करताना शेख यांनी सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला असून तुझ्या सत्तेची मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवल्याशिवाय राहणार नाही, असे शेख यांनी अधिक म्हटले आहे.



सत्तारच्या दौर्‍यामध्ये सत्तेची मस्ती उतरवणार
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांनी महाराष्ट्रभर सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्याचे आवाहन शेख यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अब्दुल सत्तारच्या पुतळ्याला जोडे मारुन त्याच्या पुतळ्याचे दहन करावे. तसेच सत्तारच्या दौर्‍यामध्ये सत्तेची मस्ती उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने करावी. याला धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांत बसू नये, असे आवाहन शेख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

नेमकं काय घडलं?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवी दिली त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !