मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले ; सुड भावनेने कारवाई नाही ; तथ्यानुसार पोलिस कारवाई करतील


The Chief Minister clearly said; No action out of revenge ; Police will act according to facts मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा आमच्या सरकारने राजकीय सूड भावनेपोटी दाखल केलेला नाही वा करणारही नाही, पोलिस तथ्यानुसार कारवाई करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याची घोषणा करताच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने होईल कारवाई
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस नियमांनुसार गुन्ह्याची चौकशी करतील. या प्रकरणी तपास करतील. पडताळणी करतील. जी काही तक्रार आहे, त्यात तथ्य असेल किंवा नसेल, त्याप्रमाणे पोलीस पुढील कार्यवाही करतील.



कायदा हातात घेतल्यास खपवून घेणार नाही
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई-नाशिक हायवेवर जाळपोळ करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमांनुसार चालते. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु, कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थिती खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही, तसा दबाव टाकलाही जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !