संविधान आर्मी काढणार ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांचा पत्रकार परीषदेत इशारा
भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाई सुडबुध्दीने करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाही विरोधात तसेच शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी संविधान आर्मी व दहा संघटनांतर्फे 2 डिसेंबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी मार्चा तर बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी भुसावळात होणार्या संविधान आर्मीच्या राज्यव्यापी अधिवेशनात सरकारच्या निषेधाचा ठराव मांडू, अशी माहिती संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी मंगळवारी दुपारी देन वाजता पत्रकार परीषदेत दिली.
ठाणे येथे निघणार तलवार मोर्चा
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटा विनय भंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच याच मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्रपती तलवार मोर्चा व तिरंगा रेल रोको आंदोलन 2 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या ठाणे जिल्ह्यात करण्यात येईल. यापूर्वी बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी भुसावळ येथे होणार्या संविधान आर्मी राज्य अधिवेशन जितेंद्र आव्हाडांचे जे चरीत्रहनन भाजपा सरकारकडून केले जात आहे. त्याच्या निषेधार्ध ठराव मांडण्यात येणार आहे. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे, भय, भ्रम आणि चारित्र्य हत्या करणे हे मनुवाद्यांचे शस्त्र आहे. या शस्त्राला आम्ही घाबरत नाही. या भाजपच्या दडपशाही व हुकूमशाहीविरुद्ध ठाणे येथे आंदोलन करण्यात येणार आहे, असे यावेळी जगन सोनवणे यांनी सांगितले.


यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी माजी नगरसेविका, माजी पंचायत समितीच्या सदस्या पुष्पा सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राकेश बग्गन, पीआरपी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख आरीफ, श्री छत्रपती सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपी साळी, टीपू सुलतान सेनेचे बाबु शहा, भारतीय ओडमसन क्रांतीचे रवी महाकाळ, संविधान आर्मी युवा जिल्हाध्यक्ष राहुल साळुंखे, थ्री छत्रपती सेना तालुकाध्यक्ष मोती कोळी आदी उपस्थित होते.