तुम्ही दुचाकीचे पेट्रोल संपवले म्हटल्याच्या रागातून पतीकडून पत्नीला चोप : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
Husband chops wife out of anger for saying you ran out of petrol for two-wheeler: incident in Muktainagar taluka मुक्ताईनगर : तुम्ही दुचाकीचे पेट्रोल संपवले, असे पत्नीने पतीला सांगितल्याचा राग आल्याने संतप्त पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पीडीत पत्नीने तक्रार दिल्यानंतर पतीविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भर रस्त्यात केली मारहाण
तक्रारदार अनिता शांताराम वाघ (लोहारखेडा) यांच्या तक्रारीनुसार पती शांताराम फकीरा वाघ यांना रविवार, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता लोहारखेडा शिवारातील शेताच्या बांधावर तुम्ही दुचाकीचे पेट्रोल संपवल्याने ते तुम्ही घेऊन या, असे सांगितले असता त्याचा राग आल्याने पती शांताराम फकिरा वाघ याने पत्नी अनिता वाघ यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून डाव्या हाताला गंभीर दुखापत केली. या संदर्भात पत्नी अनिता वाघ यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दिल्याने शांताराम वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहेत.

