भुसावळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

निंभोर्‍यातील वयोवृद्धाचा अपघाताने तर मोंढाळ्यातील वृद्धाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू


भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : भुसावळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

निंभोर्‍यातील वयोवृद्धाचा अपघाती मृत्यू
भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील किसन भानुदास सरोदे (75, शिक्षक कॉलनी, निंभोरा) यांचरा दीपनगर केंद्रासमोर दुचाकी अपघात झाल्याची घटना 7 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती. अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर जळगावातील सहयोग क्रिटीकल केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक हेमंत मिटकरी आहेत.

मोंढाळेतील प्रौढाचा विहिरीत पडल्याने मृत्यू
भुसावळ तालुक्यातील मोंढाळे गावातील अमरसिंग रामलाल परदेशी (65) यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. परदेशी यांना भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृताच्या पुतण्याने भुसावळ तालुका पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुधीर विसपुते करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !