चिखली बुद्रुक गावात पान खाण्याच्या कारणावरून वाद : एकाला मारहाण


फैजपूर (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : जवळच असलेल्याचिखली बुद्रुक या गावात पानटपरीजवळ पान खाण्याच्या कारणावरून वादातून 43 वर्षीय इसमाला एकाने शिविगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चिखली बुद्रुक गावात विजय नामदेव पाटील यांची पानटपरी आहे. या पान टपरीवर पान खाण्यासाठी नितीन दामोदर तायडे (43, चिखली खुर्द) हे आले असता पान खाण्यावरून वाद झाला आणि या वादातून त्यांना संजय सोनू पाटील (चिखली बुद्रुक) याने शिवीगाळ करीत उजव्या डोळ्यावर ठोसा मारून त्याला जवळ दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मोती पवार करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !