फैजपूरसह पाडळसेतील 19 वर्षीय तरुणीचे अपहरण


फैजपूर (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : फैजपूरसह पाडळसे गावातील दोन 19 वर्षीय तरुणींचे अपहरण करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या असून या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

फैजपूरातील तरुणीचे अपहरण
फैजपूर शहरातील महात्मा गांधी हॉलच्या बाजूला राहणार्‍या 19 वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवुन नेत तिचे अपहरण केले. फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल पाटील करीत आहे.

पाडळसेतील 19 वर्षीय तरुणीचे अपहरण
पाडळसे या गावातील रहिवाशी 19 वर्षीय तरुणी भुसावळात महाविद्यालयात गेल्याचे सांगून बाहेर पडली मात्र घरी न परतल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार फैजपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. 19 वर्षीय तरुणी आपल्या घरी भुसावळात कॉलेजला जात असल्याचे सांगून बाहेर पडली.

घराबाहेर गेल्यानंतर या तरुणीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण करीत तिला कुठेतरी डांबून ठेवल्याच्या संशयीत फिर्यादीत व्यक्त करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सोनवणे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !