यावल शहरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Yawal City यावल : शहरातील महर्षी व्यास मंदिर मार्गावर असलेल्या बाबांच्या दरगाह जवळ लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी अज्ञा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरींचे सत्र कायम
यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरा जवळील रस्त्यावर राजा बाग सवार बाबा दरगाह आहे. या दरगाहवर दर्शनासाठी शेख नईम शेख आसीफ हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.आर.8146) घेऊन आले असता रस्त्यावर त्यांनी दुचाकी लावली व दर्शनार्थ रवाना झाल्यानंतर भामट्याने दुचाकी लांबवली. शेख आरीफ शेख आसीफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.

