नापिकीला कंटाळून शेंदुर्णीतील शेतकर्याने उचलले टोकाचे पाऊल
Tired of being barren, a farmer in Shendurni took extreme steps शेंदुर्णी : आपल्या शेतातील नापिकीला कंटाळुन व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन शनिवारी विष प्राशन करीत ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (48) यांनी आत्महत्या केली.
उपचार सुरू असताना मालवली प्राणज्योत
छत्रपती शिवाजी महाराज नगरातील शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड यांनी आपल्या शेतातच शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी विष प्राशन केले. पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असा शनिवार, 19 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अडीच एकर कोरडवाहु शेती असलेल्या आपल्या शेतात ते मेहनत करुन आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी असा परीवार आहे.


