देना नगरातील रस्ते न झाल्यास पालिकेवर मोर्चा
सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांचा पालिका प्रशासनाला इशारा
भुसावळ : भुसावळ शहरातील नगरपालिका हद्दीतील गेल्या 10 ते12 वर्षांपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या प्रभाग 22 मध्ये भागा भागात रस्त्यांची निर्मिती पालिका निवडणुकीच्या तोंडावर झाली मात्र प्रभागातील अनेक भागात रस्त्यांची कामे बाकी असल्याने तातडीने ही कामे न झाल्यास पालिकेवर मोर्चा नेण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी दिला आहे.
तोंड पाहून कामांचा आरोप
जावळे यांच्या निवेदनावर पालिकेने तोंड पाहून रस्त्यांची कामे केली असून अपूर्ण कामांसाठी नागरीकांना अनेक समस्यांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बर्याचदा छोटे मोठे अपघात होत आहेत. प्रभाग क्रमांक 22 मधील देना नगरासह इतर परीसरात जेे कामे झालेले नाही तसेच ज्या ठिकाणी डांबरीकरण, कॉँक्रिटीकरण झाले त्या रस्त्यांचा दर्जा तपासावा तसेच हे काम खरोखर वर्कऑर्डरप्रमाणे झाले वा नाही याची चौकशीदेखील करावी, अशी मागणी जावळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्हाधिकारी, जळगाव यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे.

