सातोदच्या विवाहितेचा छळ : नांद्रातील पतीसह सहा संशयीतांविरोधात गुन्हा


Harassment of Satod’s wife: Case against six suspects including husband in Nandra यावल : यावल तालुक्यातील सातोद येथील माहेर असलेल्या 27 वर्षीय विवाहितेचा माहेरून दुचाकी घेण्यासाठी दहा हजार रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह सहा संशयीतांविरोधात गुन्हा
सातोद, ता.यावल येथील माहेर असलेल्या 27 वर्षीय विवाहिता सोनाली रत्नालाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 25 फेब्रुवारी 2012 मध्ये रत्नलाल सुकलाल सोनवणे (नांद्रा, ता.जळगाव) यांच्यासोबत झाला. विवाहानंतर तीन ते चार वर्ष त्यांनी विवाहितेला चांगली वागणूक दिली. नंतर तू घरात काही एक काम धंदा करीत नाही, तुला घरातले काम येत नाही, असे सांगून तिला शारीरीक आणि मानसिक त्रास दिला तसेच मोटारसायकल घेण्यासाठी माहेरून दहा हजार रुपये न आणल्याने तिचा छळ करण्यात आला. पैसे न आणल्याने विवाहितेला माहेरी पाठवण्यात आले.



यांच्या विरोधात गुन्हा
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पती रत्नलाल सुकलाल सोनवणे, सासू कल्पना सुकलाल सोनवणे, जेठ राधेश्याम सुकलाल सोनवणे, प्रतिभा राधश्याम सोनवणे (सर्व रा.नांद्रा, ता.जळगाव) तसेच आरती किसन सोळुंके, किसन सोळुंके (दोन्ही रा.कोळन्हावी) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !