देशात लव्ह जिहाद कायदा तत्काळ लागू करा
शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
भुसावळ : देशात काही धर्मांधानी जबरदस्तीने युवतीसह महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना वाम मार्गाला लावत त्यांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सातत्याने वाढणार्या घटना पाहता लव्ह जिहादसह धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
एनओसी करावी सक्तीचे
एखाद्या व्यक्तीने विवाह करण्याच्या नावाखाली जबरदस्तीने जर एखाद्या महिला वा युवतीचे धर्मांतर केले तर अशांना किमान 20 वर्ष शिक्षा देण्याची कायद्याने तरतूद करावी, संबंधित व्यक्तीला देशद्रोही विघातक कार्य करणारा व जातीय तेढ निर्माण करणारा म्हणून घोषित करण्यात यावे, जबरदस्ती ने धर्मांतर करून विवाह करण्यास भाग पडणार्या व्यक्तीला कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळू नये, शासकीय विवाहनोंदणी कार्यालयाने त्यांच्याकडे धर्मांतर करून विवाह नोंदणीसाठी येणार्या बद्दल त्या कार्याच्या संबंधित पोलिस स्टेशनला त्वरीत माहिती देऊन कळवावे, त्यांच्याकडून संबंधितांना अशा विवाहांचा नोंदणीसाठी एनओसी सक्तीची करावी व विवाह नोंदणीसाठभ मुलीचे पालक साक्षीदार म्हणून बंधनकारक करावे, अशी मागणीदेखील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिशिर जावळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

