नऊ वर्षांपासून ट्रक चालक पती बेपत्ता : कुर्ह्यातील विवाहितेने नोंदवली तक्रार
Truck driver husband missing for nine years: Complaint filed by married woman in Kurha भुसावळ : ट्रक चालक असलेला पती तब्बल नऊ वर्षांपासून बेपत्ता झाल्यानंतर विवाहितेने भुसावळ तालुका पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. ईश्वर रघुनाथ तायडे (34, कुर्हेपानाचे, ता.भुसावळ) असे हरवलेल्या इसमाचे नाव आहे.
भुसावळ तालुका पोलिसात हरवल्याची नोंद
ट्रक चालक असलेले ईश्वर हे 2013 मध्ये ट्रकवर गेल्यानंतर घरी परतलेच नाही. अनेक वर्ष त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते घरी न परतल्याने ते हरवल्याची खात्री झाल्याने त्यांच्या पत्नी सुरेखा तायडे यांनी भुसावळ तालुका पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे. रंगाने गोरे, केस काळे, नाक सरळ, उंची पाच फूट पाच इंच असे त्यांचे वर्णन आहे. याबाबत संबंधित इसम कुणाला आढळून आल्यास भुसावळ तालुका पोलिसांशी 02582-242199, 98230-32839 वर संपर्क साधावा, असे आवाहन तपासाधिकारी नाईक दीपक अशोक जाधव यांनी केले आहे.


