कर्की-रामगढ तलावामुळे शेती परीसराची समृद्धी

अ‍ॅड.रोहिणी खडसे : जनसंवाद यात्रेदरम्यान साधला संवाद


मुक्ताईनगर : कर्की-रामगढ तलावाने शेती परीरर समृद्ध होण्या मदत झाली असून त्यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांचे दृरदृष्टी त्यास कारणीभूत असल्याचे विचार अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमा रेषेवर कर्की फाट्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत आदिवासी समाज बांधवाची रामगढ वस्ती असून या वस्तीजवळच रामगढ तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जन संवाद यात्रेच्या निमित्ताने रोहिणी खडसे यांनी या तलावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

यांची सभेला उपस्थिती
यात्राप्रमुख ईश्वर रहाणे, प्रवक्ता सेलचे जिल्हा संयोजक हभप विशाल महाराज-खोले, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी यात्राप्रमुख निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, विशाल महाराज खोले, विजय सोनार, सोपान पाटील, पवन पाटील, दीपक पाटील, विलास धायडे, राजेंद्र माळी, किशोर चौधरी, सुधीर तराळ, रामभाऊ पाटील, भागवत पाटील, प्रकाश पाटील, मेहमूद शेख, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह कर्की, रामगढ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !