रावेर पंचायत समितीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार : संशयीत आरोपींनी दहा लाखांची रक्कम केली जमा


Corruption of crores in Raver Panchayat Samiti : Suspected accused deposited an amount of ten lakhs रावेर : रावेर पंचायत समितीच्या बहुचर्चित वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेल्या २२ पैकी आठ आरोपींनी त्यांच्या खात्यावर आलेली सुमारे दहा लाख रुपये तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांच्याकडे जमा केली आहे.

आतापर्यंत २४ संशयीतांना अटक
राज्यभर गाजलेल्या रावेर पंचायत समिती येथील वयक्तीक शौचालय योजनेत सुमारे दिड कोटींवर भ्रष्ट्राचार झाला होता. या प्रकरणी पंचायत समिती लेखाधिकार्‍यांसह एकूण २४ आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी दोन आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळाला असून आता तुरुंगात असलेल्यांपैकी आठ जणांनी सुमारे दहा लाख रुपये आपल्याकडे जमा केल्याचे तपास अधिकारी सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !