कोचूरच्या तरुणाचा खून : दोघा संशयीतांची भुसावळ न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता


Kochur youth murder: Two suspects acquitted by Bhusawal court भुसावळ : रावेर तालुयातील कोचूर येथे २ जून २०१३ या दिवशी विनोद ज्ञानेश्वर शिंदे (२८) याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात योगेश केशवसिंग परदेशी व प्रदीप ब्रिजलाल पाटील या दोन्ही संशयीतांवर खूनाचा आरोप होताफ. हा खटला येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालला. परीस्थितीजन्य पुराव्याअभावी दोन्ही संशयीतांची खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सबळ पुराव्याअभावी दोघे निर्दोष
विनोद शिंदे याला टॉमीने मारले अशी फिर्याद विनोदचे मामा विलास कराड यांनी पोलिस ठाण्यात दिली होती.त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हा खटला येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात चालला. यात १० साक्षीदार यांची याचे जबाब नोंदविण्यात आले. परीस्थितीजन्य पुराव्या सिध्द न झाल्याने दोन्ही संशयीतांना अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. संशयीतांतर्फे अ‍ॅड.प्रफुल्ल आर पाटील यांनी काम पाहीले. त्यांना अ‍ॅड.संजय वानखेडे, अ‍ॅड.जया झोरे यांनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !