न्यायाअभावी शेतकर्यांच्या देशात आत्महत्या वाढल्या ; बेरोजगारीतही वाढ
संविधान आर्मीचे जगन सोनवणे ः भुसावळात राज्यव्यापी मेळावा
भुसावळ : संविधान धोक्यात असून ओबीसी, सीएसटी यांचे आरक्षण संपविले जात आहेत. देशात खाजगीकरण करून कामगार उद्ध्वस्त करण्यात येत आहे. ९०० पेक्षा जास्त शेतकर्यांच्या जन आंदोलनात हत्या झालेल्या आहेत. सरकार अनेक विषय चिरडून टाकत आहे. शेतकर्यांना न्याय मिळत नसून शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे आणि सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही, अशी अवस्था सध्या देशात वाढली आहे, असे प्रतिपादन संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी केले. भुसावळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित संविधान आर्मीच्या राज्यव्यापी मेळाव्यात ते बोलत होते.
आजी-माजी आमदार हटाव काळाची गरज
जगन सोनवणे म्हणाले की, आम्ही सर्व संविधानवादी व आरक्षणवादी सर्व शक्तीने एकत्र येऊन या मनुवादी सरकारचा बंदोबस्त केला पाहिजे. शहरात आजी-माजी आमदारांचे भांडण कधीही संपणार नाही, मग भुसावळ शहर विकासाचे काय? म्हणून भविष्यात आजी-माजी आमदार हटाव व भुसावळ बचाव असा पवित्रा घेतला आहे. गेल्या दोन दशकात तालुक्यात विकासाची गंगा थांबलेली आहे. त्यामुळे शहराच्या विकासाचे काय होणार, असा प्रश्न अनुत्तरीत आहे, असेही ते म्हणाले.


तिरंगा रॅलीने वेधले लक्ष
या महामेळाव्यात दिल्लीचे कॅबिनेट मंत्री तसेच माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. राज्यव्यापी तिरंगा रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. संविधान आर्मीतर्फे राज्यव्यापी तिरंगा रॅली शहरात काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुतळ्यांना रॅलीद्वारे संविधान आर्मी राष्ट्रीय चीप जगन सोनवणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या रॅलीने भुसावळकरांचे लक्ष वेधून घेतले. महामेळाव्याच्या प्रारंभी संविधानाचे प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. अधिवेशनाला महाराष्ट्रातील ३६ जिल्हाप्रमुख यावेळी विचार मंचावर उपस्थित होते.
यांची विचार मंचावर उपस्थिती
यावेळी संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, संविधान आर्मी महिला आघाडी नेत्या, नगरसेविका तथा पंचायत समितीच्या सदस्य पुष्पा जगन सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राकेश बगन, आरीफ शेख, गोपी सोडी, संतोष आढांगडे, कल्याण आढांगडे, प्रा.सचिन सपके, अल्तमश अन्सारी, अॅड. पंकज गायकवाड, अॅड. शिवकुमार ससाने, समद कुरेशी, अतुल आढांगडे, विद्यार्थी नेते गांगुर्डे, महिला नेत्या किरण शिंदे, शबाना, वंदना काळे, इंदुमती अडांगळे, काजल गवई संगीता मोरे, मिलिंद भालेराव, अनिल सुरवाडे, शगीर शहा, चेतन सुरवाडे, अशोक आटकाळे, मध्यप्रदेश अध्यक्ष भीमनाथ इंगळे, सुभाष आगळे, नारायण सपकाळे, प्रदीप अहिरे, राहुल साळुंखे, धनराज गोडे, प्रशांत हिवरे, सिद्धार्थ झाल्टे, इरफान शेख, अशोक कोळी, पंकज कोडी, मोती कोळी, निलेश मराठे, सतीश भारंबे, राजेश भोळे, भाऊसाहेब पाटील, गणेश परदेशी, विशाल पवार, मनोहर पवार, रवी महाकाल, ब्राह्मण समाजाचे महाराज आदी मंचावर उपस्थित होते.