खेडगाव (नंदीचे) परीसरात बिबट्याने पाडला वासरूचा फडशा
A calf was killed by a leopard in the vicinity of Khedgaon (Nandi) पाचोरा : पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) शिवारात मोहाडी जंगलाजवळ असलेल्या अशोक पितांबर पाटील यांच्या शेतामध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने वासरूचा फडशा पाडला फस्त या प्रकारामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार अशोक पाटील हे शेतात गेले असता त्यांच्या निदर्शनास आला.
वनविभागाकडून पंचनामा
घटनास्थळी खेडगाव (नंदीचे) येथील उपसरपंच अभिमान बाविस्कर, नुकसानग्रस्त शेतकरी अशोक पितांबर पाटील, बापू ढमाले, वामन संतोष पाटील, दिपक विश्वनाथ पाटील, अशोक पाटील, पोलीस पाटील चंद्रशेखर पाटील, पिंटू गुजर, दत्तू ढमाले उपस्थित होते. वन विभागाचे कर्मचारी राहुल कोळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी संबंधित कार्यालयाला अहवाल पाठवणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी दिली.


आठवडाभरात तिसरा हल्ला
खेडगाव (नंदीचे) परीसरात आठवड्याभरात तिसरा हल्ला असून वन विभागाच्या कर्मचार्यांनी तसेच अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा शोध घेऊन पकडण्याची मागणी केली आहे.
