मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी शिवचरीत्र द्या : प्रवीण नायसे


भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या मार्गाने चालले तर इतिहास घडेल. मुलांच्या हातात मोबाइल ऐवजी शिवचरीत्र दिले तर ही पिढी इतिहास घडवेल, असे विचार प्रवीण नायसे यांनी समर्पण अभियान अंतर्गत शिवप्रतापदीनानिमित्त आयोजित व्याख्यानात केले. समर्पण अभियानांतर्गत तिथीनुसार असलेल्या शिवप्रताप दिनानिमित्त ३० नोव्हेंबर रोजी संतोषी माता सभागृहात सायंकाळी शिवचरीत्रावर पंतप्रधान युवा लेखक मेंटरशीप प्राप्त प्रवीण नायसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनस्थ पुतळा ठेवण्यात आला होता. नायसे यांचा त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच आर्थिक परीस्थिती हालाकिची असतांना यशाचे शिखर गाठले म्हणून माजी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी प्रवीण नायसे यांनचा गौरव केला.



शिवराय नौदलाचे जनक
नायसे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक आहेत. गुलामीचा कलंक मिटवायचा असेल तर शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे लागेल. महाराजांनी १४ व्या वर्षी हिंदवी स्वराज्यची शपथ घेतली आणि ४४ व्या वर्षी स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, शिवरायांनी नेतृत्व करत स्वतः पाचवेळा स्वतः चा जीव धोक्यात घातला. नेतृत्व करतांना स्वतः पुढे जायचे असते. महाराजांनी संयम ठेवला होता त्यांच्या या गुणांमुळेच अफजल खानाला चुका कराव्या लागत होत्या. यशस्वीतेसाठी प्रा.कौस्तुभ पाटील, अभिषेक जोशी, चेतन राजहंस, जगदीश ठाकूर, रोहित उगले यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !