अटवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

निकालानंतर उमेदवारांचा जल्लोष : माजी गणेश महाजन यांच्या पुढाकाराला यश


रावेर : तालुक्यातील अटवाडे ग्रामपंचायतीच्या सर्व जागा बिनविरोध झाल्यानंतर उमेदवारांनी जल्लोष केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दहा जागांसाठी केवळ दहाच उमेदवारी अर्ज दाखल झाले असून माजी सरपंच गणेश महाजन व जयेश कुवटे यांच्या प्रयत्नामुळे सरपंचपद व ग्राम पंचायतसदस्य बिनविरोध झाले आहेत.

अखेरच्या दिवशी ग्रामपंचायत बिनविरोध
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवार, २ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. अटवाडे गावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आला व तर नऊ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी नऊ उमेदवारी अर्ज आल्याने ही ग्राम पंचायत शेवटच्या दिवशी बिनविरोध झाली आहे. माजी सरपंच गणेश महाजन यांच्या अथक प्रयत्नामुळे ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा बहुमान मिळाला आहे. सर्वसमावेशक उमेदवारांना येथे संधी देण्यात आली असून ग्रामस्थ एकमताने पाठिशी राहिल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे माजी सरपंच गणेश महाजन यांनी सांगितले.



यांना मिळाली कारभार करण्याची संधी
लोकनियुक्त सरपंचपदी ममता किरण कोळी तर ग्रामपंचायत सदस्यपदी आर.के.पाटील, नितीनत आत्माराम धनगर, योगेश सतीष महाजन, पूनम मोहन कोळी, रेखा किशोर महाजन, कल्पना भगवान धनगर, कविता जनार्दन महाजन, वर्षा विलास पाटील, गोकुळ भावराव करवले यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने येथील सर्व जागा बिनविरोध झाल्या आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !