अपघाताचे सत्र कायम : मध्यप्रदेशातील युवकाला जळगावात चिरडले


Accident session continues: Madhya Pradesh youth crushed in Jalgaon जळगाव : भरधाव वेगाने येणार्‍या ट्रालाने दुचाकीला धडक दिल्याने मध्यप्रदेशातील दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात जळगावच्या इच्छादेवी चौकातील विशाल पेट्रोलपंपासमारील महामार्गावर गुरूवारी रा९ी ११ वाजता घडला. गोपाल आधार नाथ (३३, रा.सेंधवा मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जोरदार धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू
गोपाल नाथ हा मध्यप्रदेशातील रहिवासी असून खाजगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करीत होता. गोपाल हा खंडेराव नगरातील नातेवाईकांकडे लग्नासाठी गुरूवारी सकाळी मध्यप्रदेशातून जळगावी आला व नातेवाईकांकडील लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री ११ वाजता रामेश्वर कॉलनीत दुसर्‍या नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाला असता शहरातील इच्छादेवी चौकाच्या पुढे असलेल्या विशाल पेट्रोल पंपाजवळून रामेश्वर कॉलनीत जात असतांना भुसावळकडून धुळ्याकडे जाणारा अज्ञात ट्रालाने गोपालच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गोपालचा जागीच मृत्यू झाला.



एमआयडीसी पोलिसात नोंद
नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. शुक्रवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !