गॅरेजसाठी एक लाख रुपये न आणणार्या विवाहितेचा छळ : सुरतमधील पतीसह पाच संशयीतांविरोधात गुन्हा
Harassment of married woman who brought Rs 1 lakh for garage: Case against five suspects including husband in Surat पाचोरा : गॅरेज टाकण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये न आणणार्या पाचोर्यातील माहेर व सुरतचे सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पती सह सासरच्या पाच जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविला आहे.
एक लाख रुपये न आणल्याने छळ
पाचोरा शहरातील भीमनगर येथील रहिवासी फरीनबी यांचा विवाह गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरत येथील फिरोज हमीद टकारी यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून गॅरेज टाकण्यासाठी माहेरहुन एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी फरीनबी कडून करण्यात आली मात्र मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला.


अखेर सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फरीनबी टकारी हिने पाचोरा पोलिस स्टेशन गाठत पती फिरोज हमीद टकारी, सासरे हमीद अमीर टकारी, सासू नजमा हमीद टकारी, जेठ मोहसीन हमीद टकारी व जेठानी गौसिया मोहसीन टकारी (सर्व रा.सुरत) यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कॉन्स्टेबल शारदा भावसार करीत आहेत.
