आयटी अभियंता जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबतच बांधली लग्नगाठ


IT engineer twin sisters tied the knot with the same young man अकलुज : जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत विवाह केला असून या विवाहाची सोशल मिडीयावर तुफान चर्चा होत आहे. दोघा बहिणींना एकमेकांविषयी प्रचंड ओढ असल्याने त्यांनी एकाच तरुणासोबत विवाहाचा निर्णय घेतला. शुक्रवारी अकलुज येथे हा विवाह पार पडला तर दोन्ही तरुणी एकाच कंपनीत आयटी इंजिनिअर आहेत.

थाटात पार पडला विवाह
कांदिवली येथील रींकी व पिंकी उच्च विभूषित तरुणींनी शिक्षण घेवून आय.टी.क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणार्‍या जुळ्या बहिणी अंधेरीतील अतुल या युवकाशी शुक्रवारी दुपारी हॉटेल गलांडे येथे विवाहबद्ध झाल्या.



टॅक्सी चालकावर जडले प्रेम
गत सहा महिन्यापूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्यानंतर अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणार्‍या युवकाने तिघींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रदिवस सेवा केल्याने तिघींना अतुल विषयी आपुलकी निर्माण होवुन यातूनच जुळ्या बहिणीतील एकीचे प्रेम जडले. पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होवुन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला तर रिंकीपिंकीच्या आईनेही अतुलच्या परोपकारी वृत्तीमुळे व मुलींच्या भावनांचा विचार करी एकत्रीत विवाहास संमती दिली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !