लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : एरंडोलमधील नथ्थू बापू मियां दर्ग्यावर पांडवनगरी सार्वजनिक उत्सव समितीने चढवली भगवी चादर


A place of pilgrimage for lakhs of devotees : Pandavanagari Public Festival Committee put up a saffron sheet at Naththu Bapu Mian Dargah in Erandol एरंडोल : लाखो हिंदू व मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील नथ्थू बापू मियां दर्ग्यावर पांडवनगरी सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत भगवी चादर चढवण्यात आली. उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी उरुसानिमित्त मिरवणूक काढून वाजत-गाजत नथ्थू बापुना अनेक वर्षांपासून भगवी चादर चढवण्याची परंपरा आहे. पांडववाडा भागातून भगवी चादर मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत यांचा सहभाग
आमदार चिमणराव पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजेंद्र चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड यांच्याहस्ते आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भगव्या चादरीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी डोक्यावर घातलेल्या भगव्या टोप्या आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांच्या हातातील नथ्थू बापूंचे छायाचित्र असलेले भगवे ध्वज मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.



लेझीमने वेधले लक्ष
मिरवणुकीत सहभागी युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत लक्ष वेधले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या पदाधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाविकांनी विविध घोषणा दिल्या. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री नऊ वाजेच्या सुमारास नथ्थू बापूंच्या उरूसस्थळाजवळ पोहोचली.

पदाधिकार्‍यांचा जल्लोष
यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष रमेश परदेशी, उपाध्यक्ष जहिरोद्दीन शेख कासम, ट्रस्टी अशोक चौधरी, सुनील चौधरी, जावेद मुजावर यांच्यासह पांडवनागरी सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यांच्याहस्ते नथ्थूबापुंना भगवी चादर चढवण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी विविध घोषणा देऊन जल्लोष केला.

यांचा मिरवणुकीत सहभाग
मिरवणुकीत बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), चिंतामण पाटील, रवींद्र जाधव, मयूर महाजन, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, प्रमोद महाजन, परेश बिर्ला, राजा भेलसेकर, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, गोविंद बिर्ला, शंतनू भेलासेकर, भोला पवार, कुणाल पाटील, मयूर महाजन, नितीन बोरसे, मयूर बिर्ला, राजेश शिंपी, उमेश साळी, रवींद्र मराठे, पद्माकर मराठे, हर्जितसिंग जोहरी, करण पाटील, विजय सोनार, सागर महाजन, शिवाजी पाटील, चेतन बडगुजर, निवृत्ती महाजन, रोहित पवार, बबलू चौधरी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो भाविक सहभागी झाले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
एरंडोलचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. दुपारी उरुसानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !