रोझोदा शिवारातून पाऊण लाखांचे पांढरे सोने लंपास


White gold lampas worth a quarter of a lakh from Rozoda Shiwar सावदा : रोझोदा शिवारातील शेतकर्‍याच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी 86 हजार 500 रुपये किंमतीचा कापूस चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतकर्‍याने सावदा पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तक्रारदार भरत प्रमोद लिधूरे (28, रोझोदा) यांचे रोझोदा शिवारात सावखेडा-कोचूर गाड रस्त्यावर शेत गट क्रमांक 569/4 असून चोरट्यांनी 30 नोव्हेंबरच्या दुपारी चार ते 1 डिसेंबरच्या सायंकाळी पाच वाजेदरम्यान 76 हजार 500 रुपये किंमतीचा 9 क्विंटल कापूस तसेच दहा हजार रुपये किंमतीच्या तुरीच्या शेंगा लांबवल्या. तपास नाईक मजहरखान पठाण करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !