खिरोदा येथून 80 हजारांच्या म्हशी लांबवल्या
80 thousand buffaloes were brought from Khiroda सावदा : रावेर तालुक्यातील खिरोदा प्र.यावल गावातील कळमोदा रस्त्यावरील खळ्यातून शेतकर्याच्या 80 हजार रुपये किंमतीच्या म्हशी चोरट्यांनी लांबवल्यी. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सावदा पोलिसात गुन्हा
मानसिंग प्रतापसिंग पाटील (65, गांधी चौक, विष्णूनगर, खिरोदा) यांचा विष्णू नगर भागातील खळवाडीत गुरांसाठी खळा असून चोरट्यांनी 1 ते 2 डिसेंबरदरम्यान खळ्यातून 80 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी लांबवल्या. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.


