जळगावात पुन्हा भीषण अपघात : पाचोरा तालुक्यातील दोघे युवक ठार
Another terrible accident in Jalgaon : Two youths from Pachora taluka were killed जळगाव : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथील दोघे युवक ठार झाले. हा अपघात जळगाव तालुक्यातील शिरसोली जवळील हनुमान मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रफिक हुसेन मेवाती (23) आणि अरबाज जहांगीर मेवाती (20, दोन्ही रा.राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) अशी मयतांची नावे आहेत.
गावात पसरली शोककळा
रफिक हुसेन मेवाती हा तरुण आपल्या पाीवारासह पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे वास्तव्याला होता व जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत पेरू विक्रीकरून आपला व्यवसाय करीत होता. सोमवारी दिवसभर पेरूची विक्री करून सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एम.एच.19 सी.एच.4359) ने रफिक मेवाती हा त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (21) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळ जळगावकडे भरधाव वेगाने येणार्या कार क्रमांक (एम.एच.19 बी.जे.2175) ने जोरदार धडक दिल्याने दोघे युवक जागीच ठार झाले.


एमआयडीसी पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचार्यांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांसह व मित्रपरीवाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली.
