क्रिकेट खेळतांना बॉल शोधणार्‍या हिंगोण्यातील तरुणास सर्पदंश


Hingone youth bitten by snake while searching for ball while playing cricket यावल : तालुक्यातील हिंगोणा येथील एका 22 वर्षीय तरुणास क्रिकेट खेळत असतांना सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

प्रकृती उपचारानंतर स्थिर
हिंगोणा गावातील करण संतोष वानखेडे (22) हा तरुण मित्रांसोबत गावातील मैदानावर क्रिकेट खेळत असताना क्षेत्ररक्षण करत असतांना चेंडू मैदानाच्या बाहेर केरकचरा असलेल्या ठिकाणी गेला. तेथे बॉल शोधतांना करण वानखेडे याच्या डाव्या पायाला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निर्दशनास येताच त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. डॉ.सचिन देखमुख, अधिपरीचारीका आरती कोल्हे, कादर तडवी, अमोल अडकमोल यांनी उपचार केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !