गुजरात भाजपाचेच ! :  विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय


Gujarat belongs to BJP! : Resounding victory in assembly elections गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने दीडशेहून अधिक जागांवर भाजपने विजयी आघाडी घेतली असून काँग्रेसची ऐतिहासिक घसरण झाली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता भाजप 154, काँग्रेस 18, आप 6 तर इतर 4 जागांवर विजयी किंवा आघाडीवर आहेत.

काँग्रेसचा विक्रम मोडित
भाजपने ही मुसंडी मारताना काँग्रेसचा विक्रमही मोडित काढला आहे. 1985 मध्ये काँग्रेसने दीडशतकी जागा जिंकून इतिहास रचला होता. गेल्या 37 वर्षांत कुठल्याही पक्षाला 150 हून अधिक जागा जिंकता आल्या नव्हत्या. अगदी गेली 27 वर्ष सत्तेवर असणार्‍या भाजपलाही ते जमलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. हा भाजपने आतापर्यंत पटकवलेल्या जागांचा कमाल आकडा होता. मात्र यावेळी भाजपने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.


कॉपी करू नका.