भुसावळ बसस्थानकात पाकिटमारी करताना दोघांना अटक
Two people were arrested for pickpocketing at Bhusawal bus stand भुसावळ : शहरातील बसस्थानकात मुंबईतील प्रवाशाच्या खिशातून पाच हजारांची रोकड लांबवताना दोघांना पकडण्यात प्रवाशांना यश आले तर संशयीत महिला मात्र पसार झाली. या प्रकरणी तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींना अटक
तक्रारदार अशोक पंडित जाधव (50, स्टार सिटी ज्युचंद्र नायगाव, मुंबई) हे गुरुवार, 8 रोजी सकाळी आठ वाजता बसच्या प्रतीक्षेत असताना संशयीत आरोपी सुरज अशोक भांगे (25), हसन अली उर्फ आशू नियाज अली (19, दोन्ही रा.पापानगर, भुसावळ) व 25 वर्षीय अनोळखी महिलेने जाधव यांच्या खिशातील पाच हजार रुपयांची रोकड असलेले पाकिट लांबवले. यावेळी दोघा आरोपींना पकडण्यात प्रवाशांना यश आले मात्र महिला मात्र पसार झाली. या प्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून तिघा आरोपीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक शशीकांत तायडे करीत आहेत.


