बनावट जाहिरातीद्वारे धरणगावच्या वृद्धाची सव्वा लाखात फसवणूक

फेसबुकवर टाकली होती बनावट जाहिरात ; दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा !


धरणगाव : धरणगावच्या वृद्धाची बनावट जाहिरातीच्या माध्यमातून एक लाख 19 हजारात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांनी फेसबुकवर ‘पतंजली’ योगा प्रशिक्षणाची बनावट जाहिरात टाकून त्या माध्यमातून ही फसवणूक केली.

फसव्या जाहिरातीद्वारे फसवले
धरणगाव शहरातील हेमबिंदू नगरात किशोर मंगेश पाटील (60) हे आपल्या परीवारासह वास्तव्यास असून बुधवार, 7 ऑगस्ट 22 रोजी किशोर पाटील यांना मो.नं.9433273072, 9748067069 यांनी फेसबुकवर पतंजली योगपीठ ट्रस्ट युनिट-2, हरीद्वार, उत्तराखंड या संस्थेला योगासन आणी प्राणायाम सात दिवसांच्या प्रशिक्षणाबाबत टाकलेली जाहिरात दिसली. या जाहिरातीत प्रशिक्षणासाठी पंतजली योगपीठ ट्रस्ट युनिट- 2 खात्याचा क्रं. 1905190190059665 टाकलेला होता. किशोर पाटील हे प्रशिक्षण करण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी ‘फोन पे’द्वारे टप्याटप्याने एकूण एक लाख 19 हजार रुपये 7 ऑगस्ट रोजी दुपारी 1.59 वाजता तसेच गुरुवार, 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.27 वाजेच्या दरम्यान वेळोवेळी टाकले. परंतु याबाबत संपर्क साधल्यावर पैसे परत करण्यास टाळाटाळ व्हायला लागली. फसवणुू झाल्याचे लक्षात आल्यावर किशोर पाटील यांनी मो.नं. 9433273072, 9748067069 धारकाविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्यानंतर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !