कुर्हेपानाचे गावात हॉटेल मालकाचे घर फोडले
कुर्हेपानाचे गावातील घटना : अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
A hotel owner’s house was broken into in Kurhepanache village भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत हॉटेल मालकाच्या घरातून 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
आरती स्वानंद बडगुजर (38, अंबिकानगर,कुर्हे) या हॉटेल व्यावसायीक असून कामानिमित्त त्या बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी साडेआठ हजारांची रोकड, तीन हजार रुपये किंमतीचे दोन मनगटी घड्याळ मिळून एकूण 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.


भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
ही घरफोडी मंगळवार, 6 डिसेंबर रोजी दुपारी दोन ते गुरुवार, 8 रोजी सायंकाळी साडेसहा दरम्यान झाली. बडगुजर या बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास नाईक गणेश गव्हाळे करीत आहेत.
