भुसावळात अंडाभूर्जीचे पैसे मागणार्या विक्रेत्याला मारहाण
A vendor who demanded money from Andabhurji was beaten up in Bhusawal भुसावळ : अंडाभूर्जी ग्राहकाला दिल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाने विक्रेत्याला लोखंडी झार्याने मारहाण केली. ही घटना भुसावळ शहरातील स्टेट बँक समोर शनिवारी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बिल मागितल्याच्या रागातून मारहाण
भुसावळ शहरातील स्टेट बँक समोर गजानन भिकाजी पवार (57, देना नगर, भुसावळ) हे अंडा भुर्जीची गाडी चालवून कुटुंबाचा रहाटगाडा हाकतात. शनिवार, 10 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान संशयीत ईश्वर उर्फ निलू प्यारेलाल आटवाल (वाल्मीक नगर, भुसावळ) यांने अंडाभूर्जी खाल्ल्यानंतर त्यास बिल मागितल्याने त्याचा संशयीताला रागा आला व त्याने लोखंडी झारा दुकानदार गजानन पवार यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी ईश्वर प्यारेलाल आटवाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नाईक निलेश चौधरी करीत आहेत.


