सत्यशोधक चळवळीचे कार्य देशासाठी दिशादर्शक : आमदार शिरीष चौधरी


भुसावळ : सत्यशोधक चळवळीचे कार्य देशासाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे विचार आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. सत्यशोधक समाज संघाचे दुसरे अधिवेशन तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथे रविवारी झाले. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे होते. प्रमुख अतिथी म्हणून पहिल्या महिला ओ.बी.सी.साहित्य संमेलन अध्यक्षा आचार्या विजया मारोतकर, चंद्रकांत चौधरी, भीमराव खलाणे, मोरसिंग राठोड, अनिल महाजन, बाबूराव घोंगडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, तेली समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, समाधान पाटील, नाना पाटील, एकनाथ बडगुजर, सरपंच कविता उंबरकर, सावता माळी संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन उपस्थित होते. पहिल्या सत्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांनी मशाल पेटवून केले. सामूदायीक तळी उचलण्याचा विधी विधीकर्ते भगवान रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केले. राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी जळगाव जिल्हा सत्यशोधक कार्यकर्त्यांचे स्मारक करण्यासाठी संघ कटीबद्ध असल्याचे सांगितले.



सत्यशोधक कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे
स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. चर्चा सत्रात जळगाव जिल्हा आणि सत्यशोधक चळवळ विषयावर मार्गदर्शन करतांना सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक जी.ए.उगले (पैठण) मार्गदर्शनात म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव,आडगाव, अमळनेर, यावल,खिरोदा ते कुर्‍हा (पानाचे) गावांमध्ये सत्यशोधक कार्यकर्त्यांचे अतुलनीय प्रेरणादायी योगदान आहे. सध्या संघाचे कार्य त्यांच्याच कार्याच्या प्रेरणेने सुरू असल्याचे ते म्हणाले. भारतातील शेतकर्‍यांबाबत सत्यशोधक चळवळीची भूमिका मांडतांना सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक विश्वासराव पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांचे मिळणारे उत्पन्न व मिळणारा हमीभाव यातील तफावतीमुळे होणारे नुकसान कायदेशीर लढ्याने हक्काने मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवरा व नोकरी या दोनच समस्या : डॉ.झाल्टे
डॉ.सुरेश झाल्टे म्हणाले की, आजचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक पतन यामुळे आर्थिक विकास खुंटला आहे. सत्य शोधकाची संस्कृती, विचार सोडल्याने आजच्या समाजासमोर फक्त दोनच समस्या आहे त्या म्हणजे मुलीला नोकरदार नवरा मिळाला पाहिजे व मुलाला नोकरी मिळाली पाहिजे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ.समाधान बारी, संजय वराडे , विलास रंदाळे, राजीव जाधव, लक्ष्मण जाधव, शारदा महाजन, आशा वराडे, दुर्गा शिंदे, अरविंद बावस्कर, किशोर पाटील, दत्तू बावस्कर, प्रमोद उंबरकर, सुधाकर बडगुजर, डॉ.उमेश पाटील, आकाश कुरकुरे, प्रमोद पाटील (गोंभी), आशा गागोदेकर,अर्चना तांबे, निवृत्ती बाविस्कर यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !