विजेचा धक्का लागताच 45 वर्षीय प्रौढ जागीच ठार ; या गावातील घटना
चोपडा : तालुक्यातील बिडगाव कुंड्यापाणी रोडवर डिपीजवळ विजेच्या धक्क्याने बिडगावातील प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्तात्रय आत्माराम पाटील (४६) असे मयताचे नाव आहे.
विजेचा धक्का लागताच मृत्यू
रविवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता दत्तात्रय पाटील हे चोपडा तालुक्यातील बिडगाव कुंड्यापाणी रोडवर असलेल्या डीपीजवळ सिंगल फेज वर तार हातात घेऊन फेरफार करून जम्पिंग करत असताना त्याला विजेचा धक्का लागला. या विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयदीप राजपूत करत आहे.


