भुसावळातील शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये अनोळखीचा मृत्यू


Death of a stranger in Shivaji Complex in Bhusawal भुसावळ : शहरातील शिवाजी कॉम्प्लेक्स परीसरात 35 वर्षीय तरुण जखमी अवस्थेत आढळला होता. त्यास जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू ओढवला. अनोळखी इसमाची अद्यापही ओळख पटली नसल्याने बाजारपेठ पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
शहरातील शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास 35 वर्षीय अनोळखी तरुण जखमी अवस्थेत आढळल्याने त्यास जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यन त्याची 21 नोव्हेंबर रोजी प्राणज्योत मालवली. या प्रकरणी डॉ.नितीन विसपुते यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचे वय 35, उंची 160 सेंटीमीटर, शरीराने सडपातळ, केस काळे, दाढी वाढलेली, उजव्या हातावर इसरावली राम उग्रग्रह मशीदरा अंजली असे गोंदले असून ओळख पटत असल्यास बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हवालदार गणेश प्रल्हाद चौधरी यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !