Mehunbare Murde मेहुणबार्यातील निर्घृण खुनामागे आले हे प्रमुख कारण : वाचून बसेल धक्का !
प्रेम प्रकरणातून तरुणीशी विवाह केल्याचा भावाला राग अनावर : तरुणाच्या वडिलांचा केला खून
Mehunbare Murder चाळीसगाव : तालुक्यातील मेहुणबारे येथे तरुणीला पळवून तिच्याशी विवाह केल्याच्या रागातून प्रियकर तरुणाच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवार, 16 डिसेंबर दुपारी एक वाजेच्या सुमारास मेहुणबारे शहरातील गिरणा विद्यालयापासून काही अंतरावर घडली. या घटनेत दगडू वामन गढरी (खैरनार) (52, तिरपोळे) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयीत सचिन राजेंद्र चव्हाण याच्याविरोधात मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अतिशय निर्घृणपणे हत्या
राष्ट्रीय महामार्गावरील मेहुणबारे गावातील गिरणा महाविद्यालयापासून काही अंतरावर भर दिवसा अत्यंत क्रुर पद्धत्तीने प्रौढाची हत्या करण्यात आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. दगडू गढरी यांचा मुलगा जगदीश याने मेहुणबारे गावातील एका तरुणीला पळवून नेत तिच्याशी प्रेमविवाह केला होता व तरुणीच्या कुटुंबियांना याचा राग होता. त्यातून दोघा परीवारांमध्ये अधून-मधून खटकेही उडत होते.


भरदिवसा हत्येने मेहुणबारे हादरले
शुक्रवारी दुपारी दगडू वामन गढरी (खैरनार) हे तिरपोळे येथून मेहुणबारे येथे रेशन घेण्यासाठी आले होते व परत गावाकडे निघाले असतानाच मेहुणबारे हायस्कूलजवळ तरुणीचा भाऊ सचिन राजेंद्र चव्हाण हा दुचाकीवरून धारदार शस्त्र (धारा) घेवून आला व त्याने सपासप गढरी यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड व सहकार्यांनी धाव घेतली.