पतीचे सात दिवसांपूर्वीच निधन : विरहात बहाळच्या विवाहितेने मृत्यूला कवटाळले
Husband passed away seven days ago : Bereaved Bahal’s married woman faced death चाळीसगाव : सप्तपदीच्या सात फेर्यांसोबत आयुष्यभर साथ देण्याचे वचन निभावलेल्या पत्नीने पतीच्या अपघाती मृत्यूनंतर विरहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे घडली. बहाळचे वाहन व्यावसायिक संदीप रामभाऊ पाटील (34) यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी दीपाली संदीप पाटील यांनीदेखील 16 रोजी पहाटे साडेपाच वाजता विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याने या परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
पतीच्या निधनानंतर पत्नीला जबर धक्का
बहाळमधील वाहन व्यावसायीक संदीप रामभाऊ पाटील यांचे शनिवार, 10 रोजी सुरत येथे लिंबू घेऊन जात असतांना रात्री 10:45च्या सुमारास खडकी फाट्याजवळ अपघाती निधन झाले होते. माल वाहतूक करणार्या गाडीला झालेल्या अपघातात संदीप पाटील यांच्यासह वाहन चालकाचादेखील मृत्यू झाला होता. पतीच्या अकाली झालेल्या मृत्यूने संदीप पाटील यांच्या पत्नी दीपाली यांना जबर मानसिक धक्का बसला होता.


विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या
अमळनेर तालुक्यातील झाडी शिरसाळे येथील माहेरवाशीन असलेल्या दीपालीने पतीच्या अपघाती मृत्यूनंतर अन्न-त्याग केला शिवाय शुक्रवार, 16 रोजी सकाळी पहाटे 5.30 वाजेच्या विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केली. विवाहितेच्या दोन्ही चिमुकल्यांनी वडिलांच्या अपघाती निधनानंतर मोठ्या शोकाकुल वातावरणात आईलाला अग्निडाग दिला.