बोदवडला ब्रेक फेल झालेली बस डिव्हायडरवर धडकली : प्राणहानी टळली मात्र दुचाकीचे नुकसान

चालकाच्या प्रसंगावधानने मोठा अपघात टळला : बसमधील प्रवासी सुदैवाने बचावले


Bodwadla brake failure bus hits divider : avoid loss of life but bike damaged बोदवड : भुसावळ-हरणखेडा बसचे अचानक रस्त्यात ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवत बस डिव्हायडरकडे नेल्याने दुचाकीचे नुकसान झाले मात्र मोठा अपघात टळला. हा अपघात शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडला. या बसमध्ये एकूण 53 प्रवासी होते मात्र त्यांना ईजा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक फेल होताच दुचाकीचे नुकसान
शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास भुसावळकडून हरणखेडा गावाकडे निघालेली बस (क्र. एम. एच.20 बी. एल.948) ही बोदवड बसस्थानकाकडे जात असतांना जुन्या तहसील कार्यल्यासमोरील थांब्यावर काही काही प्रवासी उतरले व बस पुन्हा मार्गस्थ हेाताच बसचे अचानक ब्रेक निकामी (फेल) झाल्याने बस चालक राजेंद्र बारी यांनी तत्काळ गाडीचा गिअर बदलत बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटल व नंदिनी साडी सेंटर समोरील डिव्हायडरवर धडकवली मात्र या अपघातात दुचाकी क्र. (एम. एच.19 डी. 4271) चे मोठे नुकसान झाले. या बसमधे सुमारे 53 प्रवासी असल्याचे वाहक प्रदीप बर्‍हाटे यांनी सांगितले.



चालकाच्या प्रसंगावधानाने टळली मोठी प्राणहानी
सकाळी वर्दळीच्या वेळी ब्रेक फेल झालेली ही बस जर आणखी काही फूट पुढे आंबेडकर चौक भागातील व्यापारी संकुलाच्या समोरील रस्त्याने पुढे आली असती तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती होती मात्र चालक बारी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानने हा मोठा अपघात टळला. या अपघाताबाबत चालक राजेंद्र बारी यांच्या खबरीवरून बोदवड पोलिस ठाण्यात अपघाताची नेांद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक शशिकांत शिंदे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !