दीपनगर प्रकल्पाच्या कोळश्याची चोरी : फुलगावच्या तिघा संशयीताविरोधात गुन्हा


Coal Theft Of Deepnagar Project : Crime Against Three Suspects From Phulgaon भुसावळ : दीपनगर प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवणार्‍या धावत्या वॅगनमधून कोळसा चोरी केल्याप्रकरणी फुलगाव येथील करन कैलास कुर्‍हाडे याच्यासह तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धावत्या वॅगनमधून पाच टन कोळश्याची चोरी
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुणाल लहू वाघोदे यांच्या तक्रारीनुसार, संशयीत करन कुर्‍हाडे याच्यासह अन्य दोन संशयीत हे बुधवार, 14 डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता पिंप्रीसेकम गेटजवळील रेल्वे पोल क्रमांक बीटीपीएस 458 च्या पोलजवळ सार्वजनिक जागी धावत्या वॅगनमधून 20 हजार रुपये किंमतीचा पाच टन कोळसा चोरी करताना आढळल्याने त्यांना हटकताच संशयीतांनी कोळसा सोडून पळ काढला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !