जळगावात मद्यपी पतीचा पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला
Drunken husband attacks wife with sharp weapon in Jalgaon जळगाव : शहरातील राजीव गांधी नगरात मद्यपी पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी रात्री केला हल्ला
शहरताील राजीव गांधी नगरात संगीता रमेश झेंडे या वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास संगीता यांना काही एक कारण नसतांना त्यांचे पती रमेश झेंडे यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान धारदार वस्तूने संगीता यांच्या डाव्या कानाच्या खाली दुखापत केली. यात संगीता झेंडे या जखमी झाल्या असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे पती रमेश बाबासाहेब झेंडे (45) याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.

