भुसावळातील तरुणीचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा दाखल


molestation of young woman in Bhusawal : Case registered against both भुसावळ : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरेाधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील इशारे करीत विनयभंग
29 वर्षीय पीडीता मेडिकल व्यावसायीक असून गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी मेहेरसिंग इंदरसिंग चंडाले (नंदनवन कॉलनी, भुसावळ) व चंदनकुमार महेंद्र पासवान (तापी नगर, भुसावळ) यांनी औषध विक्रीच्या दुकानावर येत अश्लील इशारे करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करीत विनयभंग केला. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !