70 हजारांच्या दागिण्यांवर डल्ला : देऊळगाव गुजरीतील प्रकार


Dalla on 70 thousand jewels : type from Deulgaon Gujri जामनेर : तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे महिलेच्या घरातून दोन जणांनी 70 हजारांच्या दागिण्यांवर डल्ला मारला. या प्रकरणी पहूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांवर व्यक्त केला संशय
पार्वताबाई प्रभाकर सोनवणे (55, देऊळगाव गुजरी, ता.जामनेर) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पार्वताबाई सोनवणे या घरी नसताना गावातील दिव्या गोकुळ सोनवणे आणि कल्पनाबाई गोकुळ सोनवणे यांनी महिलेच्या घरात सुटकेसमधील ठेवलेले 70 हजारांचे दागिणे लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पार्वताबाई सोनवणे यांनी शनिवार, 17 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता पहूर पोलिसात तक्रार नोंदवल्याने संशयीत आरोपी म्हणून दिव्या गोकुळ सोनवणे आणि कल्पनाबाई गोकुळ सोनवणे यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल किरण शिंपी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !