एकाच महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्या : ब्लॅकमेलिंगचा संशय


नवी दिल्ली :  तीन विद्यार्थिनींनी सात दिवसांच्या अंतराने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उत्तर प्रदेशातील सीतापूर येथून समोर आली आहे. कमलापूर येथील आरबीएसएस महाविद्यालयात सात दिवसांत एका पाठोपाठ तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली असून तिनही अल्पवयीन होत्या हे विशेष ! तिन्ही मुलींचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी अकरावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केली होती. त्यानंतर बारावीत शिकणार्‍या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. दहावीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने हाताची नस कापून घेतली आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. विद्यार्थिनींवर अत्याचार होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

१२ संशयीत ताब्यात
पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वत:हून दखल घेत गुन्हा नोंदवला, त्यानंतर सुमारे १२ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर एका विद्यार्थिनीने नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिसरीतील विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. प्राचार्यांनी ब्लॅकमेलिंगचा संशय व्यक्त केला आहे. कोरोनामुळे सर्वांचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले होते. प्रत्येकाकडे मोबाईल होता. ज्या गटातून मुली शिकत होत्या त्या गटात मुलांचाही समावेश होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही चौकशी समितीही स्थापन केली आहे, असंही प्राचार्य साकिब जमाल अन्सारी म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !