चिखलीतील भारत निर्माण योजनेंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला प्रश्न


Investigate the malpractices under Bharat Nirman Yojana in Chikhli मुक्ताईनगर : तालुक्यातील चिखली येथे भारत निर्माण योजनेंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी ते म्हणाले की, चिखली येथे भारत निर्माण योजनेंतर्गत गैरव्यवहार केलेल्या संबंधिताविरुद्ध कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश व जळगाव गटविकास अधिकार्‍यांना दिल्यानंतरही संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाहीत.

चौकशी प्रगतीत : गुलाबराव पाटील
याप्रश्नावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प.ने चौकशी अधिकारी म्हणून प्राधिकृत केल्यानुसार त्यांनी चौकशी केली असून त्यात समितीने केलेले कामाचे घेतलेले देयक व प्रत्यक्षात आढळून आलेले कामानुसार रक्कम 16 लाख 92 हजार 68 इतकी तफावत आढळून आली आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परीषद, जळगाव यांनी 27 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये गटविकास अधिकारी पंचायत समिती, मुक्ताईनगर यांना चौकशी अहवालाप्रमाणे वरील रक्कम ही संबंधित तांत्रिक सेवा पुरवठादार तत्कालीन अध्यक्ष व सचिव व सर्व तत्कालीन ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समिती, चिखली यांच्याकडून वसुलीचे आदेश देण्यात आल आहेत शिवाय वसुलीस प्रतिसाद न मिळाल्यास आर.आर.सी.किंवा फौजदारी कारवाई करण्याबाबत कळविले होते.

ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती चिखली ग्रामपंचायतीचे तत्कालीन सदस्यांनी आम्ही पाणीपुरवठा समितीचे सदस्य अथवा लाभार्थी नाही व माझ्या बनावट सह्यांचे कागदपत्र व दस्ताऐवज तयार केल्याचा खुलासा सादर केला आहे आहे त्यामुळे या सर्व बाबींची चौकशीचे काम प्रगतीत आहे. ग्रामपंचायत व स्वच्छता समिती, चिखली ग्रामपंचायतचे तत्कालीन सदस्य यांनी चौकशीनंतर पुन्हा नवीन बाबी उपस्थित झाल्याने या बाबींची चौकशी गट विकास अधिकारी स्तरावरून प्रगतीत असल्याने विलंब होत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !