धरणगाव हादरले : किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या


Dharangaon Shook : Brutally killed a young man over a petty Dispute धरणगाव : जिल्ह्यात नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र जल्लोष सुरू असताना धरणगावात मात्र किरकोळ वाद उफाळल्याने 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कालू सोनवणे (30, दहिवद तांडा, शिरपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

किरकोळ वादातून झाला खून
धरणगावच्या कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर कामासाठी येतात. शनिवार, 31 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास कालू सोनवणेचा जिनिंगमधील काही बिहार भागातील मजुरांसोबत किरकोळ विषयातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. साधारण 15 ते 17 जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून पसार झाले. कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळ्या भागात पथक रवाना केली.



रात्रभरात 17 संशयीत आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
अनोरे, धानोरे,गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. एकेक करून पहाटेपर्यंत पोलिसांनी तब्बल 17 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, विनोद संदानशीव, मिलिंद सोनार, पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील या पथकाने रात्रभर जंगल भागात शोध घेऊन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !