चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ : उर्फी प्रकरणात महिला आयोगाची नोटीस
Chitra Wagh’s problem increases : Commission for Women notice in Urfi case मुंबई : बोल्ड फॅशनमुळे ओळखली जाणारी उर्फी जावेदच्या अंग प्रदर्शनावर अलीकडेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र आक्षेप नोंदवत उर्फीला विरोध नाही, पण तिचा नंगानाच सुरू आहे, त्याला विरोध असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती शिवाय काल चित्रा वाघ यांनी पत्रकार परीषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परीषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली.
अवमानना केल्यानेच नोटीस
चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न केला, ज्यातून आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 1993 कलम 92 (2) (3) नुसार ही नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर यांनी म्हटलं आहे. उर्फी जावेदवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो, असे चाकणकर यांनी म्हटले. त्यानंतर, चित्रा वाघ यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसवर त्यांनी खुलासा सादर न केल्यास, त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल, असा इशाराच चाकणकर यांनी दिला.

महिला आयोगाच्या दुटप्पी पणावर केले होते भाष्य
चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच महिला आयोगाच्या दुटप्पीपणावर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. याप्रकरणी दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं होतं.