मनावर विजय प्राप्तीचा आधार ‘एकनाथी भागवत’ : उमेश महाराज दशरथे


फैजपूर : उद्धवगीतावरील टीका म्हणजे एकनाथ भागवत. भागवती खांब आधारभूत आणि सौंदर्य वाढवणारा असून जीवन जगायला लागणार्‍या सार्‍या वस्तू मनुष्याकडे असताना सुद्धा समाधान नाही, तर साधूंकडे यातले काहीही नसताना ते मात्र समाधानी आहेत, असे विचार उमेश महाराज दशरथे यांनी येथे व्यक्त केले. फैजपूर येथे सामूहिक विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सवात ग्रंथकौस्तुभ एकनाथी भागवताच्या चतुशतकोत्तरी महोत्सवी वर्षानिमित्त प्रवचन सोहळ्यात ते प्रवचनादरम्यान बोलत होते.

जीवन जगताना जपावी प्रतिष्ठा
उमेश महाराज दशरथे म्हणाले की, या विश्वात आपण सारे परीस्थितीमध्ये सुख शोधतो तर साधू मनस्थितीमध्ये सुख शोधतो. यावरून एकनाथी भागवताची फलश्रुती ही कोणत्याही परीस्थितीमध्ये समाधानी कसं राहायचं ? व हृदय रुपी विहिरीतून लोभ क्रोधरुपी षडरीपू बाजूला सारून जीवन आनंदी कसं करायचं हे शिकवत असल्याचा उपदेश त्यांनी दिला. तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून जीवन जगण्याची कला यावेळी उपस्थितासमोर मांडण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !